हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभागी होत स्‍वातंत्र्यदेवीचा जयजयकार करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

🔸चंद्रपूर जिल्‍हयात १३ ते १५ ऑगस्‍टदरम्‍यान राबविणार हर घर तिरंगा अभियान – देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-भरतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमीत्‍त मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या संकल्‍पनेतुन राबविण्‍यात येणारे हर घर तिरंगा या अभियान चंद्रपूर जिल्‍हयात दिनांक १३ ते १५ ऑगस्‍ट दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. हजारो लाखों स्‍वातंत्र्यवीरांच्‍या बलिदानातुन १५ ऑगस्‍ट १९४७ रोजी आपली पुण्‍यभू भारतमाता परकियांच्‍या बेडयातुन मुक्‍त झाली. स्‍वातंत्र्याचा मंगलकशल आपल्‍या हाती आला. भारतीय स्‍वातंत्र्याचे हे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. स्‍वातंत्र्य लढयातील वीरांच्‍या बलिदानाचे स्‍मरण करत स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आपण साजरा करणार आहोत. हर घर तिरंगा या अभियानात नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभागी होत स्‍वातंत्र्यदेवीचा जयजयकार करावा, असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या अभियानाअंतर्गत दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ९.०० वा. ध्‍वजारोहण करण्‍यात येणार असून स्‍वातंत्र्यदिनी दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी सायं. ६.०० वा. तिरंगा ध्‍वज ससन्‍मान खाली उतरविण्‍यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी तिरंगा ध्‍वज वितरीत करणार आहे. प्रत्‍येकाने आपआपल्‍या घरावर तिरंगा ध्‍वज फडकावयाचा असून तो फडकवताना ध्‍वज संहितेचे पालन करायचे आहे. राष्‍ट्रध्‍वजाचा कोणताही अवमान होणार नाही याची खबरदारी घ्‍यायची आहे. आपल्‍या व्‍हॉट्सअॅप डिपीवर ध्‍वजा सोबतचे फोटोज अपलोड करणे, ध्‍वज हाती घेवून काढलेले फोटोज सोशल मिडीयावर प्रसारित करणे यावर देखील या अभियानाअंतर्गत भर देण्‍यात येणार आहे. याशिवाय जिल्‍हाभर विविध देशभक्‍तीपर कार्यक्रमांचे आयोजनही भारतीय जनता पार्टीतर्फे करण्‍यात येणार आहे.

भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या या अमृत महोत्‍सवी उत्‍सवात नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभागी होण्‍याचे आवाहन भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्‍हेरी, हरीश शर्मा, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, राजेश मुन, कृष्‍णा सहारे, रामपाल सिंह, राजीव गोलीवार, प्रकाश धारणे, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष अल्‍का आत्राम, महिला आघाडी महानगर जिल्‍हाध्‍यक्ष सौ. अंजली घोटेकर, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे, संदीप आवारी आदी भाजपा पदाधिका-यांनी केले आहे.

चंद्रपूर, नागपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED