बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे ९ आगस्ट ला नागपूर येथे विदर्भ स्तरिय बैठकीचे आयोजन

34

✒️नागपुर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 नागपूर(दि.7ऑगस्ट):- बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे त्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दिनांक ९ आगस्ट २०२२ ला आमदार निवास, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे विदर्भ स्तरिय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थानी वाशिम येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामप्रभू सोनोने हे राहतील.

याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.रामटेके, राष्ट्रीय महासचिव पी.एच.गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ.चरणदास सोळंके, सल्लागार सुभाष मेश्राम,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे, महासचिव प्रा. डॉ.रविकांत महिंदकर, कोषाध्यक्ष प्रा.अशोक ढवळे ,स़ंगटन सचिव शेषराव रोकडे, शिवदास कांबळे,, सहसचिव मुन्ना आवळे,दीनकर मडकवाडे, उपाध्यक्ष चैनदास भालाधरे,सामाजिक कार्यकर्त्या निर्मला श्रीकृष्ण उबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, प्रा. डॉ.टी.डी.कोसे,( सचिव वर्ल्ड फेलोशिप आफ बुद्धिस्ट अंतर्गत पंचशील सम्यक दान समिती,ब्यांकाक थायलंड),प्रा. डॉ.राजकुमार सोनेकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय शिडाम , कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष सुधाकर तेलसे, सचिव किशोर काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राज्याध्यक्ष राजकुमार जवादे यांनी केले आहे