चिडीमार प्रतिबंधक पथक स्थापन करण्याची मागणी

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7ऑगस्ट):- येथील ओबीसीं इंडियाच्या प्रदेशध्यक्ष लक्ष्मण लटपटे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन गंगाखेड यांना चिडीमार प्रतिबंधक पथक स्थापन करण्या बाबत निवेदन देण्यात आले असून गंगाखेड शाळा कॉलेज ट्युशन खाजगी शिकवण तसेच शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुली गंगाखेड येथे येता.

त तसेच ट्युशन वरून घरी जात असताना रात्री चे 7ते 8 वाजे ट्युशन वरून घरी जात असताना तसेच शाळा किंवा कॉलेज जात असताना मुलीची छेडछाड होऊ नये तसेच यामुळे मुलींमध्ये व पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच काही अनुचित प्रकार घडू नये, या करिता माननीय साहेबांनी लवकरात लवकर चिडीमार पथक स्थापन करण्यात यावे.

या निवेदनावर सही करणारे ओबीसी प्रदेशध्यक्ष लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष,बालासाहेब सूर्यवंशी भटक्या मुक्ती समाज प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र,संदीप केंद्रे संपर्क जिल्हाध्यक्ष ओबीसी व पालक, संघमित्र गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भाजपा,गंगाधर कांबळे यांच्या उपस्थितीमध्येपोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गंगाखेड,येथे निवेदन देण्यात आले.