दुर्गा वाहिनी हिंदूवीर प्रतिष्ठान- किवळे च्या युवती व महिलांनी केले सैनिकांसाठी राखी संकलन

✒️राजगुरुनगर प्रतिनिधी(मनोहर गोरगल्ले)

राजगुरुनगर(दि.७ऑगष्ट):- किवळे गावातील, दुर्गा वाहिनी हिंदूवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति आदर व प्रेम व्यक्त करत, रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने युवती व महिलांनी राखी संकलन केले आहे. कर्तव्यावर असणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी ह्या राख्या पाठवल्या जाणार आहे.

आज भैरवनाथ मंदिरात, छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करून राख्यांचे संकलन केले गेले, यावेळी काही युवतींनी आपले मनोगत व्यक्त करताना, रक्षाबंधन सणाचे महत्व व सीमेवर लढणाऱ्या, भारत मातेच्या सैनिकांप्रति आदर व्यक्त केला.या कार्यक्रमास दुर्गा वाहिनी हिंदूवीर प्रतिष्ठानच्या युवती, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED