कोव्हिड सर्वांसाठी अनोखा असताना देखील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली–डॉ.प्रमोद दौडे

30

🔹अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने निवासी डॉक्टरांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान

✒️अंबाजोगाई,प्रतिनिधी(शेख फेरोज)मो:-७०२०४७५२८७

अंबेजोगाई(दि.8ऑगस्ट):-जागतिक महामारी कोव्हिडने देशाला हादरवून सोडले होते .अचानक आलेली ही जागतिक महामारी वैद्यकीय क्षेत्रासाठी अनोखी होती.तेव्हा त्या महामारीबाबत कुठलिही महिती व अनुभव नसतांना देखील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केली व रुग्णांचे प्राण वाचविले असे प्रतिपादन स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद दौडे यांनी केले . ते आज अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्ष्यानिमित्ताने आयोजित निवासी डॉक्टरांचा कोरोना योध्दा सन्मान सोहळ्यात बोलत होते . यावेळी व्यासपीठावर अंबाजोगाई पिपल्स बँकेचे जेष्ठ संचालक प्रा वसंत चव्हाण, प्रा.डी एच थोरात, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा,महादेव आदमाने, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड उपस्थित होते.

याबाबत सविस्तर व्रत असे की अंबाजोगाई शहरातील नावाजलेली अंबाजोगाई पिपल्स को -ऑप बँक ही बँकेचा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे .त्यानिमित्ताने बँकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत . त्याचाच भाग म्हणून आज निवासी डॉक्टरांचा त्यांनी कोव्हिड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले . या कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व माता योगेश्वरी देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार म्हणाले की डॉक्टर म्हणजे एक देवरूपी माणूसच असतो . अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे कोव्हिड महामारीत स्वा रा ती तसेच लोखंडी सावरगाव येथील कोव्हिड सेंटर येथील डॉक्टर , अधिसेविका , अधिपरिचरिका , तसेच वॉर्ड बॉय यांच्या सह स्वच्छता कर्मचारी यांनी रुग्णांना जीवनदान देण्याचे अनमोल असे काम केले आहे . कोरोना काळात स्वतःचे नातेवाईक जवळ येत नव्हते मात्र येथील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना नवसंजीवनी देण्यासाठी मेहनत घेतली . प्रसंगी ते कोरोनाग्रस्त झाले मात्र त्यांनी रुग्णसेवेचा वसा खाली पडू दिला नाही . या त्यांच्या ऋणातून काही अंशी का होईना आपण उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न राजकिशोर मोदी व त्यांचे सहकारी करत असल्याचे रापतवार यांनी सांगितले .

यापूर्वीही बँकेच्या वतीने केवळ अर्थकारणच न करता सामाजिक भान ठेवून नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी , शिक्षक बांधव ,पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, अंगणवाडी सेविकां , आशा वर्कर , त्याचबरोबर कोव्हिड काळात उल्लेखनिय कर्तव्य बजावनाऱ्या सामाजिक संस्थांचा देखील सत्कार व सन्मान कोव्हिडं योद्धा म्हणून करण्यात आला असल्याचे विजय रापतवार यांनी आवर्जून उल्लेखित केले .

या कार्यक्रमात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद दौडे बोलताना म्हणाले की राजकिशोर मोदी हे सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व असून ते सदैव गरजू , तसेच अडचणीत आलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जातात . तसेच त्यांनी सुरू केलेला कोव्हिडं योध्दा सन्मान हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले . अशा कौतुकाने सोहळ्याने जोमाने व जवाबदारीने काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळते असेही डॉ. दौडे यांनी उल्लेखित केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डी. एच थोरात यांनी सांगितले की कोव्हिडं१९ सारखे जैविक युद्ध होईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. त्यावर कुठलीही लस देशात उपलब्ध नव्हती .देशात लसीचा शोध लावण्यात निवासी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा होता. निवासी डॉक्टरांचे काम हे अतिशय अतुलनीय असं असल्याचे प्रा थोरात यांनी सांगितले. तसेच राजकिशोर मोदी यांनी केलेल्या कामाबद्दल डॉक्टरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन काम करण्यासाठीची ऊर्जा वाढविली त्याबद्दल मोदी यांचे आभार व अभिनंदन केले .

सन्मान सोहळा प्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. चिन्मय इंगळे म्हणाले की अंबाजोगाई पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आमचा केलेला सन्मान व सत्काराने आम्हा सर्वां डॉक्टरांना पुढे काम करण्याची एक ऊर्जा मिळाली. कोव्हिडं हा आम्हा सर्व डॉक्टरांना नवीनच असतांना देखील डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा केली .कोरोना काळात वेगवेगळी सामाजिक भावना अनुभवयास मिळाली .मार्ड संघटनेच्या वतीने आपण आणखी दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करीत राहू असे देखील डॉ. चिन्मय इंगळे यांनी आश्वाशीत केले .कोरोना योध्दा सन्मान सोहळा संपन्न करण्यासाठी महेश वेदपाठक, अजीम जरगर , जुनेद सिद्दीकी यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. अनंत कांबळे यांनी केले तर आभार माजी नगरसेवक महादेव आदमाने यांनी व्यक्त केले .