२३ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे विनामूल्य आयोजन

104

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.8ऑगस्ट):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ वतीने दरवर्षी कविंच्या काव्यलेखनीला धार मिळण्यासाठी…प्रतिभेला फुलविण्यासाठी संपूर्ण महाराष्टातील कवी कवयिञींसाठी विनामूल्य राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कवी कवयिञींची ही मानाची स्पर्धा समजली जाते.त्यासाठी श्रावण व निसर्ग या विषयांवरील दोन कविता फक्त पोष्टाने पाठवाव्या.असे आवाहान काव्यमंच वतीने करण्यात आलेले आहे.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,स्मृतीचिन्ह,गौरवपञ
पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते.प्रत्येक सहभागींना आकर्षक फोरकलर सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सहभागी कवी कवयिञींची श्रावणी काव्यमैफलही घेण्यात येते.दरवर्षी या काव्यलेखन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कविता पाठविण्याची अंतिम दिनांक ३१ आॅगस्ट २०२२ आहे.

कविता पाठविण्याचा पत्ता-
राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे,नक्षञाचं देणं काव्यमंच,साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,भोसरी,पुणे-३९.

नक्षञाचं देणं काव्यमंच हे कविंच्या हक्कासाठी..सन्मानासाठी गेली अनेक वर्ष अहोराञ कार्य करत आहे.अनेकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करत आहे.अनेक महाकाव्यसंमेलन,काव्यमैफल,काव्यबैठका,काव्यसादर कार्यशाळा,गझल कार्यशाळा,काव्यसहली,काव्यसंग्रह प्रकाशन इ.विविध उपक्रम विनामुल्य राबविलेले आहेत.भविष्यात व्यासपीठ मिळण्यासाठी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहान कवी वादळकार,पुणे यांनी केले आहे.