मोर्शी तालुका गृहरक्षक दलातर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण !

92

🔹मोर्शी तालुक्यामध्ये हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती !

🔸मोर्शी तालुका गृह रक्षक दलाचा अभिनव उपक्रम !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.8ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी मोर्शी तालुका गृहरक्षक दलातर्फे मोर्शी पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण, हर घर तिरंगा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासना तर्फे राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात मोर्शी शहरासह तालुक्याचा सुद्धा मोठा सहभाग असावा, यासाठी जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने मोर्शी तालुका गृह रक्षक दलातर्फे ठिकठिकाणी या अभियानाची माहिती देत जनजागृती करण्यात आली.

यावेळी सदर कार्यक्रमास मोर्शी येथील पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे, सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, विजय लेव्हलकर, रुपेश वाळके, पलटण नायक दिनेश पंडागळे ,अ. लिपिक मनोज काटोलकर, कंपनी कमांडर अब्दुल सलीम , अनिल मेश्राम ,सागर लोहकपुरे, अमोल चरपे, नामदेव सुरजुसे यांचेसह गृह रक्षक दलाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गृह रक्षक दलातर्फे मोर्शी येथे विविध मान्यवारांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ह्या कार्यक्रमासाठी मोर्शी पथक गृहरक्षक दलाचे अधिकारी कर्मचारी व मोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवुन वृक्षारोपण केले. आज पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. झाडे लावा झाडे जगवा तेव्हाचं मनुष्य जीवंत राहु शकतो ही भावना मनात ठेवुन या उदात्त हेतुने गृह रक्षक दलाचे कर्मचारी, विद्यार्थी, पोलीस विभागाचे कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी झाले असल्याचे प्रतिपादन रुपेश वाळके यांनी यावेळी केले.