सैदापूर येथे ह.भ.प.शिवाजी महाराज यांचा ओमसाई परिवाराच्या वतीने भव्य सत्कार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.8ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे सैदापूर येथे वै.श्री.दिगंबर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची श्री ह.भ.प.गुरुवर्य महंत शिवाजी महाराज, श्रीक्षेत्र नारायणगड यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली याप्रसंगी ओम साई श्रद्धा मल्टी अर्बन परिवारातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी तीर्थराज शेळके, मच्छिंद्र तकिक, गोरख शेळके, अशोक शेळके ,भारत थिटे, विष्णुपंत दातखीळ, अंकुश दातखीळ, गणेश शेळके, बद्रीनाथ धांडे, हनुमान पाटील, अमोल महाराज डोंगरे, काका महाराज दातखीळ, बाबासाहेब राजेंद्र शेळके, गणेश हाकाळे, नारायण बहिर,मोहन तकिक ,दिनकर हाकाळे, ओम साई श्रध्दा मल्टीपल निधीचे चेअरमन धनंजय जोगदंड, ओम साई श्रद्धा मल्टी अर्बन परिवार व सैदापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED