सहेली महिला मंचातर्फे आयोजित गीत गायन स्पर्धा संपन्न

26

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(8ऑगस्ट):-दिनांक 06/08/2022 रोज शनिवारला सहेली महिला मंचातर्फे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्वला वैद्य यांनी स्वतःचे रक्षण मुलींनी कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच प्रमुख पाहुण्या निता मिश्रा,डॉ.शहाणे , डोंगरे मॅडम,श्रीमती भांडवलकर यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्तविक संयोजिका माधुरी जसुतकर यांनी केले .तसेच कार्यक्रमाचे संचलन डॉ.मृणालिनी टूले आणि प्रिती महीले यांनी केले.स्पर्धकांना प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह तसेच रोपटे व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.गीत गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक राजीव गांधी मेमोरियल हायस्कूल,द्वितीय मॉडेल हायस्कूल,तृतीय इंदिरा कन्या हायस्कूल , प्रोत्साहन पर गुरुकुल कॉन्व्हेन्ट स्कूल,तसेच मातोश्री कॉन्व्हेन्ट स्कूल यांनी पटकाविले.

आभारप्रदर्शन संगीता मांडोकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहेली महिला मंचाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला संत लटारेमहाराज संस्थान यांनी सहकार्य दिले. कार्यक्रमाची सांगता तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनेने करण्यात आली.