स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त कुरुल तलाठी कार्यालय यांच्या वतीने झेंड्याचा वाटप

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.8ऑगस्ट):- रोजी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतंत्र्याचा ७५व्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५व्यावर्षी पदार्पण करत आहोत. या निमित्ताने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकाच्या मनाचा उत्सव आहे.

कुरुल तलाठी बी.एल.शिंदे , यांच्या हस्ते कुरुल मधील नागरिकांना झेंडा देण्यात आले.त्यावेळी सरपंच माणिक पाटील, सदस्य सुभाष माळी, क्लार्क अमोल पाटकर कोतवाल केशव माने, दर्याबा जाधव, विठ्ठल लामतुरे, युवराज कांबळे आप्पाराव ननवरे, बापू सलगर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED