भाजपाचे पूरग्रस्तांसाठी वेकोलि विरोधात चक्का जाम आंदोलन

🔸जनसेवेसाठी अहोरात्र धडपडणारे देवराव भोंगळे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.8ऑगस्ट):-शनिवारी, सायंकाळी घुग्घुसमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने नाले व तलाव तुडुंब भरून वाहू लागले. वेकोलिच्या दुर्लक्षामुळे बँक ऑफ इंडियाच्या मागे सखोल परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले, अन्नधान्य पाण्यात वाहून गेले. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली, अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली.

ही माहिती नागरिकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना सांगितली त्यांनी लगेच भाजपा पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्त भागात पाठविले त्यांनी पूरग्रस्तांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. रात्री ९ वाजताच्या सुमारास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बँक ऑफ इंडिया परिसरातील घरोघरी जाऊन पहाणी केली, नागरीकांच्या अडचणी समजून घेतल्या.

रविवारी, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते बँक ऑफ इंडिया परिसरातील नागरिकांना लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उपलब्ध धान्यकीटचे वाटपही करण्यात आले. वेकोलिच्या तलावाचे पाणी नाल्यातून वाहून बहिरमबाबा मंदिरातून बाहेर निघाले. वेकोलिने हा नाला साफ केला नाही. रेल्वे रुळाच्या बाजूने मोठी नाली आहे याचे बांधकाम सुरु आहे. रुळाच्या खालून लहान नाली आहे. या नालीचे पाणी बँक ऑफ इंडिया परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले त्याअनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, कपूर व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वे रुळाच्या जवळील मोठ्या व लहान नालीची तसेच तलावाची पाहणी केली. पाहणी दरम्यान वेकोलिचे दुर्लक्ष दिसताच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

दुपारी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात बहिरमबाबा मंदिराजवळ वेकोलि विरोधात रास्तारोको आंदोलन छेडले. चक्का जाम झाल्याने कोळसा वाहतूक ठप्प झाली व वेकोलिच्या कोळशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.वेकोलिच्या विरोधात रस्त्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी, बँक ऑफ इंडिया परिसरातील महिलांनी व नागरिकांनी ठिय्या मांडला. याप्रसंगी वेकोलि विरोधात प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली.भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्वतः एक जेसीबी मशीन बोलावून नालीच्या रुंदीकरणाचे व सफाईचे काम सुरु केले.

आंदोलनाची तिव्रता ओळखून वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंध उदय कावळे, वेकोलिचे अतुल सिंग व कोलते यांनी आंदोलनस्थळी येऊन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व आंदोलकांच्या मागण्या सांगण्याची विनंती केली. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तीन मोठे पाईप टाकून तलावाच्या नालीचे खोलीकरण करण्यास सांगितले. या मागण्यांसंदर्भात तात्काळ मागणीची दाखल घेत वेकोलिने तीन मोठ्या जेसीबी मशीन बोलावून नाली खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु केले. काम सूरू झाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

रात्री ११ वाजेपर्यंत भर पावसात उभे राहून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे तसेच वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर नाली खोलीकरणाचे काम केले.सोमवारी, सकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बहिरमबाबा मंदिराजवळील नाली खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली. जेसीबी मशीनने रास्ता खोदून नाली खोलीकरणाचे काम सुरु होते यावेळी वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे व कपूर उपस्थित होते. खोदकाम सुरु असल्याने सकाळी कोळशाच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठिय्या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, विनोद चौधरी, सिनू इसारप, रत्नेश सिंग, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, हसन शेख, शाम आगदारी, सुनील बाम, शरद गेडाम, बबलू सातपुते, गुड्डू तिवारी, सुनील राम, विक्की सारसर, मानस सिंग, राजू डाकूर, चंद्रकला मन्ने, सुनीता पाटील व मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED