मोहरम’ हा आनंदाचा सण नसून दुःखाचा दिवस आहे

88

🔸 चंद्र आधार मानून तारखा आणि तिथी निश्चित केली जाते

🔹 शिया लोक सुतकाचे दिवस म्हणून हे दिवस पाळतात

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.9ऑगस्ट):-मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव आहे. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होत असते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन आणि हजरत इमाम हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम ३० जुलैपासून सुरू झाला आहे. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फरक असल्याने दर वर्षी मोहरमची तारीख बदलते. यावर्षी मोहरम ३० जुलैला सुरू झाला असून, आता इस्लामिक हिजरी १४४४ सुरू झाला आहे. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राला आधार मानून तारखा आणि तिथी निश्चित केल्या जातात.

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची इमाम हसेन आणि इमाम हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात तारीख-ए इस्लाम हे ऐतिहासिक युद्ध झाले होते. इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वतःला खलिफा घोषित केले. परंतु, इस्लाममध्ये ‘बादशाही’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवंडांसह अनेकांनी नकार दिला.हजरत इमाम हुसैन यांनी आपल्याला खलिफा मानण्यास नकार दिल्याने त्यांचे शीर कलम करण्याचे फर्मान यजीदने सोडले. हिजरीच्या महिन्यातील एका रात्री हजरत हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं.

परंतु, हे फर्मान नाकारून हजरत इमाम हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. परंतु, संतप्त यजीदने आपले सैनिक हजरत हुसैनना मारण्यासाठी पाठवले. हजरत इमाम हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हजरत इमाम हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. हजरत हुसैनचे ७२ अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ इमाम हुसैन आणि त्यांचा ६ महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हजरत इमाम हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली.

परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याला बाण मारून शहीद करण्यात आले. या युद्धात हजरत इमाम हुसैन यांनाही शहीद करण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे ‘मातम का महिना’ म्हणून पाहतात. मोहरम हा आनंदाचा सण नसून दुःखाचा , दिवस आहे. या दिवशी हजरत इमाम हसन आणि हजरत इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात.

इस्लामी कालगणनेचा पहिला मास. मुहर्रमचा शब्दशः अर्थ ‘पवित्र’ असा आहे. ‘पवित्र कुराणा’त (९·३६–३७) संकेतित केल्याप्रमाणे चार पवित्र मासांपैकी (मुहर्रम, शव्वाल, जिल्काद व जिल्हज्ज) मुहर्रम हा एक पवित्र मास होय. मुहर्रम पहिल्या तारखेपासून सुरू होऊन दहा दिवसापर्यंत चालतो. मुहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशूरा म्हणतात.शिया लोक सुतकाचे दिवस म्हणून हे दिवस पाळतात. कारण मुहंमद पैगंबराचे नातू हजरत इमाम हुसैन हे आशूरेच्या दिवशी यजीद मुवावियाकडून हुतात्मे झाले. त्याची दुःखद स्मृती म्हणून पहिले नऊ दिवस ताजिये वा ताबूत बसवून ते या दहाव्या दिवशी विसर्जित करतात. हजरत अली, हजरत हसन व हजरत हुसैन या हुतात्मात्रयीच्या हौतात्म्यास इस्लामी इतिहासात असाधारण महत्त्व आहे.

आशूरा मुहर्रमचा पवित्र दहावा दिवस म्हणून आणि मुहर्रम हा सृष्टी उत्पत्तीचा महिना म्हणून सुन्नी मुसलमानांना पवित्र वाटतो. मुहंमद पैगंबरांनी आपल्या अनुयायांना आशूरा या दिवशी उपवास करण्यास व प्रार्थना करण्यासंबंधी आदेश दिला. तसेच या दिवशी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, डोळ्यात सुर्मा लावणे, अत्तर-सुगंध लावणे हे श्रेयस्कर असल्याचे सांगितेले आहे. शत्रूंशी शांततेचा तह करणे, सत्संग राखणे, अनाथांना आश्रय देणे व दानधर्म करणे यासंबंधीही त्यांनी आज्ञा केली. प्रेषितांनी आशूरेच्या उपवासाची विशेषेकरून महती सांगितलेली आहे.

त्या शहिदांना स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो. इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फरक असल्याने दर वर्षी मोहरमची तारीख बदलते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राला आधार मानून तारखा आणि तिथी निश्चित केल्या जातात.