जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे एम एस स्वामीनाथन जयंती

33

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)

गोंडपीपरी(दि.9ऑगस्ट):–जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे डॉ स्वामिनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मान आवडे सर होते सर प्रमुख पाहुणे उराडे सर,गोंडे सर,उमरे सर,मोरे सर,गेडाम सर,चौधरी मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषय शिक्षक विठ्ठल गोंडे सर यांनी केले.डॉ स्वामीनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

तसेच वर्ग 6 वी तील श्रुती वागदरकर, प्रियंका mallelwar, नव्या वेलादी तर वर्ग 7 वी तील माही दुर्गे,तन्वी मेश्राम,समीक्षा पिंपळकर, प्रणय वागदरकर,आर्यन पिंपळकर, वैभव मेश्राम या विद्यार्थ्यांनी डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या कार्याबद्दल उत्कृष्ट भाषण दिले.तसेच उराडे सर यांनी स्वाभिनाथन आयोग बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच मुख्याध्यापक आवडे सर यांनी तामिळनाडू मध्ये जन्म घेतलेल्या सर्व शास्त्रज्ञाबद्दल उत्तम माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माही दुर्गे या विद्यार्थ्यांनीने केले तर सर्व उपस्थित शिक्षकांचे आभार प्रणय वागदरकर याने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोरे सर,उमरे सर, गेडाम सर, गीतांजली चौधरी मॅडम यानी सहकार्य केले. अशा प्रकारे विठ्ठलवाडा शाळेत डॉ एम एस स्वामीनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.