धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत परळीत दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी ध्वजांचे मोफत वितरण

31

🔹नाथ प्रतिष्ठाण 10 हजार ध्वज वितरित करणार; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धनंजय मुंडेंचा पुढाकार

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.9ऑगस्ट):- माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीतील सर्वसामान्य नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होता यावे यासाठी श्री. मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत परळी शहरात दि. 11 व 12 ऑगस्ट रोजी मोफत तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशवासियांना आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा ध्वज फडकवता येणार आहे. त्यामुळे नाथ प्रतिष्ठाणच्या मार्फत फडकवण्यासाठी तयार स्वरूपात काठी लावलेले तब्बल 10 हजार तिरंगा ध्वजांचे मोफत वितरण करण्याचे नियोजन नाथ प्रतिष्ठाण मार्फत करण्यात आले आहे.

परळीला सांस्कृतिक, धार्मिक त्याचबरोबर चळवळीचा वारसा आहे. इथल्या नागरिकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात आयोजित अभियानात सहभागी होता यावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान 11 व 12 ऑगस्ट असे दोन दिवस नाथ प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदींच्या मार्फत 10 हजार तिरंगा ध्वजांचे वितरण करण्यात येणार असून, हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याबाबत शासनाने घालून दिलेली नियमावली व तिरंगा ध्वजाचा मान व संहिता सांभाळून नागरिकांनी अधिकाधिक संख्यने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.