


✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)
कुरुल(दि.9ऑगस्ट):;स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाच्या निमित्ताने भारतीय स्वतंत्र लढ्याच्या स्मृती क्रांतिकारकांचे स्वातंत्र संक्रमणातील बलिदान त्याग वाहना देशभक्ती या सर्व घटनांचे स्मरण जनमानसात राहावे तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ला एक व्यापक स्वरूप देण्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या घरी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये झेंडा फडकविण्यात यावा, असे या प्रभात फेरी मधून घोषणा दिल्या जात होत्या.
हर घर तिरंगा माधवनगर शिक्षण मंडळाच्या माधवनगर हायस्कूल माधवनगर मध्ये, स्वातंत्र्याच्या अमृत* महोत्सवानिमित्त* विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.*आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी* शाळेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या समूहगीत स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या *मुख्याध्यापिका* *सौ विद्या चव्हाण मॅडम* शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच अनिल पाटील,सदस्य श्री जयदीप कदम व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अनेक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले हर घर तिरंगा घोषणा देण्यात आल्या.




