राजभवन आणि बोगसगिरी

56

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

महाराष्ट्रात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात बोगसगिरी चाललेली आहे. राजभवनातच बोगस पीएचडी वाटण्यात येतात. इतकेच नव्हे तर जगभरात बोगस पीएचडी वाटणारे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करतात. अंडरवर्ल्डशी संबंधित ( व मध्यंतरी NIA ने ताब्यात घातलेले ) समाजकंटक राजभवनात सत्कार समारंभ आयोजित करतात आणि कुलपती कोश्यारी या गैरकृत्यांवर पांघरून घालतात. एमसीआयमचे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांच्याही भ्रष्ट कारकीर्दीवर राज्यपाल अशाच प्रकारे पांघरून घालत आहेत.

महाराष्ट्रातील नवी मुंबईत डी. वाय. पाटील या विद्यापीठाचे स्कूल ऑफ आयुर्वेद नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या डीन या प्रमुखपदी महेश कुमार हरित हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हरित यांची विशेष: १० वी व १२ वीची शैक्षणिक प्रमाणपत्रे चक्क बनावट असल्याची धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने ( एसआयटी ) प्रथमच वाचकांसमोर आणली.

हरित यांच्या बीएमएस, एमडी या प्रमाणपत्रांमध्येही असंख्य बाबी संशयास्पद आहेत, ही माहितीही सर्वप्रथम ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीने वाचकांसमोर आणली. यानंतर हरित यांच्याविरोधात असंख्य तक्रारीही करण्यात आल्या. मात्र तरीही एमसीआयएम (Maharashtra Council of Indian Medicine) चे भ्रष्ट रजिस्टर डॉ. दिलीप वांगे यांनी या बोगस डॉक्टरकडून लाच घेवून त्यांच्या रजिस्ट्रेशनचे पुन्हा नूतनीकरण केले. वांगे यांची कारकीर्दही अत्यंत भ्रष्ट स्वरूपाची आहे. राज्यातील अनेक बोगस डॉक्टरांना त्यांनी रजिस्ट्रेशन व प्रत्येक वेळेला नुतनुकरणही करून दिलेले आहे. ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीने हे सत्य पुराव्यानिशी अनेकदा मांडले आहे, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही.

*राजभवनातूनच होतात तक्रारी ‘मॅनेज’*

▪राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उल्हास मुणगेकर या भ्रष्ट अधिकाऱ्याची सचिव पदी निवड केलेली आहे. ही निवड नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. राज्यपाल कोश्यारी यांना फक्त सत्कार समारंभातच रस आहे. जनतेचे विशेषतः विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना काडीमात्र रस नाही. अशावेळी मुणगेकर राज्यपाल यांच्या या अवगुणाचा फायदा घेवून डॉ. दिलीप वांगे यांसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या गैरकृत्यांवर पांघरून घालतात.

आतापर्यंत वांगे व मुणगेकर यांनी कोट्यवधी रुपयांची अफाट काळी माया गोळा केलेली आहे. या सर्वांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी असंख्य वेळेला सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे, मात्र त्याची कोणत्याही स्वरूपाची दाखल घेण्यात आलेली नाही.

“स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने हरित यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रशचिन्ह उभे केले आहे, ते अगदी योग्य आहे. याविषयीची तक्रार आम आदमी पार्टीतर्फे, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांच्याकडे केलेली आहे. मात्र त्याची अद्याप दाखल घेण्यात आलेली नाही.”

धनंजय शिंदे 
सचिव, महाराष्ट्र, 
आम आदमी पार्टी 

सहकार्य:*उन्मेष गुजराथी*
*स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी*