मंठा येथील वैष्णवी गोरे खून प्रकरणातील आरोपीस फाशी द्या–सुशांतभाऊ गोरवे

    64

    ?नँशनल  सोशालिस्ट पार्टी यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना निवेदन

    ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    बारामती(4 जुलै):-जालना जिल्ह्यातील मंठा येथील *वैष्णवी गोरे* या नवविवाहित तरुणीचा भर रस्त्यात भर चौकात खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी, असे निवेदन नँशनल सोशालिस्ट पार्टी  युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी     महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  पाठवण्यात आले आहे.
    मंठा जिल्हा जालना येथील वैष्णवी गोरे या तरुणीचे नुकतेच लग्न होऊन रिवाजाप्रमाणे येती जातीसाठी माहेरी आलेल्या नवविवाहित तरुणीचा क्रुरकर्मा शेख अल्ताफ याने भरदिवसा चौकामध्ये चाकूने वार करून खून केला आहे हि घटना मनाला हेलावून टाकणारी आहे,,
    या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष  घावे, असे सुशांतभाऊ गोरवे यांनी मागणी केली आहे.
    निवेदनात केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास नँशनल सोशालिस्ट पार्टी व मँटर सक्सेस ग्रुप पै. सुनीलभाऊ पालवे,सुशांतभाऊ गोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे अशी माहीती पार्टीचे मीडीया प्रमुुख तथा विदर्भ प्रमुख नशीबतथा विदर्भ प्रमुख नशीब झाडे यांनी दिली झाडे यांनी दिली.