वैनगंगानदी लगत असलेल्या गावांना पुराचा झटका

37

🔹अर्हेर – नवरगाव, पिंपळगाव येथे पुरमय परिसर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11ऑगस्ट):-अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर येत आहेत. पावसाचा हाहाकार सर्वत्र सुरू आहे. मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी शहरी ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सर्वत्र पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले दुथडी स्वरुपात वाहत आहेत.अक्षरशः अर्हेर – नवरगाव, पिंपळगाव (भो) येथे पुरमय परिस्थिती बघायला मिळत आहे. लोकांना पुरामुळे अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने पूरस्थिती बघता नियोजन करावे.