राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून स्व .श्री .गजाननराव अगडे यांना श्रद्धांजली

22

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमुर(दि.11ऑगस्ट):-राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर चे अध्यक्ष स्व.श्री. गजाननराव अगडे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून श्रद्धांजली वाहण्यात आली.ओबीसी समाजाला न्याय व हक्कासाठी गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रम घेऊन समाजाला जागृत केले.संघटणेत असतांना आपल्या विशिष्ट शैलीने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाने संघटना वाढण्यास मदत झाली.त्यांच्या निधनाने संघटनेची खुप हाणी झाली.

त्यांच्या जाण्याने संघटणेत फार मोठी पोकळी निर्माण झाली ती पोकळी न भरणारी आहे.राष्ट्रिय ओबीसी महासंघ चिमुर चे रामदास कामडी, कवडू लोहकरे व प्रभाकरराव पिसे , रविंद्र उरकुडे , राजकुमार माथुरकर यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमुर कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अविनाश अगडे ,हर्षल डुकरे , रोहित थेरे व इतर ओबीसी बांधव उपस्थित होते.