भारतीय राष्ट्रध्वज अशोक चक्रा विना घेऊन फिरणाऱ्यांवर राष्ट्रद्रोह(?)

🔹डेमोक्रॅटिक आरपीआय पॅन्थर स्टाईल ठोकणार

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.11ऑगस्ट):-“देशात हर घर तिरंगा” या नुसार जागोजागी तिरंगा फडकवण्यात येत आहे. परंतु अशोक चक्रा विना तिरंगा फडकवनार्यावर राष्ट्रद्रोह प्रमांणे कार्यवाही करावी अश्या आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमिक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे दिले आहे.

देशाच्या 75 वर्धापण दिनानिमित्ताने नव चैतन्य उभारले आहे. मात्र: अस असतांना बाजारात सर्रासपणे भारतीय ध्वज हा अशोक चक्रा विणा विक्री केला जात आहे, फडकवण्यात येत आहे. शोभा यात्रेत तर बाईक आणी सायकल रॅली मध्ये वापरण्यात येत आहेत. अश्या ठिकाणी व इतरात्र जर अशोक चक्रा विना राष्ट्र ध्वज दिसून आले तर अश्या आयोजक प्रयोजक व ध्वज घेऊन फिरणाऱ्यांना पॅन्थर स्टाईल दणका देणार असल्याचेही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

विना अशोक चक्र भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबणा असून अश्या अपमान करणाऱ्या व्यक्ती प्रवृत्ती आणी कंपनी वर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्यात यावी व मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्फतीने संबंध राज्याला तसे निर्देश व आदेश देण्यात यावेत असेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हनाले.

महाराष्ट्र, मुंबई, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED