डॉ.सुरेश राठोड यांना विधान परिषदेवर संधी द्यावी देशातील अनेक मान्यवरांची एकमुखी मागणी

56

🔸महाराष्ट्रातील राज्यपाल,मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12ऑगस्ट):-अखंड हिंदुस्तानातील जातीभेद नष्ट करणारे छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीमध्ये जन्मलेले डॉ सुरेश किसन राठोड यांनी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्यांनी कमी कालावधीमध्ये सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. साहित्य कलेच्या क्षेत्रातही त्यांचे अतुलनीय योगदान राहिलेले आहे. डॉ सुरेश राठोड यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर सदस्य म्हणून संधी मिळाल्यास महाराष्ट्राच्या विकासाला चांगला हातभार लागणार आहे, आतापर्यंतची त्यांची वाटचाल लक्षात घेऊन कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक व्यक्तीनी डॉ. राठोड यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य करावे, अशी मागणी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी सुद्धा डॉ. राठोड यांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांकडे आग्रह करावा, असेही तरुणांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

डॉक्टर राठोड हे सामाजिक कार्यात नेहमीच आग्रह असतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता ते अनेकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून अग्रक्रमाने स्वतः त्याचा पाठपुरावा करीत असतात. दुःखी कष्टी पिढीतांचे तसेच विद्यार्थी आणि कामगार क्षेत्रातील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. म्हणूनच त्यांच्या पाठीमागे तरुणांची उभी फळी तयार असते. कार्य कुशल व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या कलागुणांना संधी मिळाली तर ते नक्कीच सोने करतील, असेही या तरुणांनी म्हटले आहे. त्यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. महाराष्ट्र शासन मराठी विश्वकोशचे सदस्य डॉ.कृष्णदेव गिरी, माजी आमदार जालना मदन कुलकर्णी, श्रीराम पतसंस्थेचे संचालक बी.ए पाटील, पतंजलीचे चिकित्सक अरुण गिरी (बिहार), डॉ. गिरीवर गोस्वामी (दिल्ली), समाजसेवक संदीप सरदेसाई, डॉ.नितीनकुमार तीवाटणे, डॉ. सुशील अग्रवाल, शशिकांत कांबळे व अनेक सामाजिक संस्था, फाउंडेशनही त्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. राज्यपाल त्यांचा नावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील, असेही या तरुणांनी निवेदनामध्ये विनंती केली आहे.