


✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)
परळी(दि.12ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात येत्या शनिवारी म्हणजे *13 ऑगस्ट* रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.
*आपल्या लाडक्या नेत्या मा. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे.*
सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्तीप्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनी या रॅलीत तर सहभागी व्हायचेच आहे परंतु आपापल्या प्रभागातील नागरिकांना तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, डाॅक्टर्स, वकील, स्वयंसेवी संस्था तसेच समाजाच्या सर्व घटकांतील नागरिकांना या रॅलीत सहभागी करून घ्यायचे आहे. रॅलीत *पांढऱ्या शुभ्र गणवेशात* यायचे आहे. अतिशय जल्लोषात आणि भव्य अशी ही रॅली आपणांस काढावयाची आहे.
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही रॅली यशस्वी करावी अशी आपणांस नम्र विनंती आहे.
*भारतीय जनता पार्टी परळी*




