✒️गेवराई(शेखआतिख,तालुका प्रतिनिधी)

       मो:-9767177932

गेवराई ( 4 जुलै ) :- जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी नारायण गोरे हिचे नुकतेच लग्न होऊन ती मांडव परतणीसाठी माहेरी आली असता तिचा एकतर्फी प्रेमातून भरदिवसा भरचौकात धारदार शस्त्राने मानेवर व हातावर सपासप वार करून आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू याने खून केल्याची ह्रद्यद्रावक घटना घडली असून या घटनेतील आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
सदर घटना मन हेलावून टाकणारी व अत्यंत क्रूर असून या ह्रदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून हे प्रकरण फास्टृॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील गेवराई तालुका समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. नसता समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला असून याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी असे देखील प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED