राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात तिरंगा जनजागृती रँली

43

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.12ऑगस्ट):-प्रत्येक घरी तिरंगा मोहिमेला मजबुती देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रत्येक गावात, शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम” सुरु आहे.

या अंतर्गत प्रत्येक घरी तिरंगा अभियान सुरु आहे. अभियाना अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत सलग तीन दिवस राष्ट्रध्वज घरांवर फडकवला जाईल. याचीच जनजागृती करण्याकरिता गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात तिरंगा जनजागृती रँली काढण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, उपविभागीय पोलीस निरीक्षक संजय सांगळे, पोलीस स्टेशन चिमूर पोलीस उपनिरीक्षक सोरते, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. पितांबर पिसे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेश्वर रहांगडले, वाणिज्य विभागाचे डॉ. लक्ष्मन कामडी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रासेयो स्वयंसेवकानी उपस्थित मान्यवरांना राष्ट्रध्वज देऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अधिकार, राष्ट्रध्वज सहिंता समजून घेतली. कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे, डॉ. नितीन कत्रोजवार यांनी केले.