आझादी का अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्य लढयातिल दुर्मिळ चित्र प्रदर्शनीचे आयोजन

30

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.12ऑगस्ट):-भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, दक्षिण मध्य रेल्वे, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या 1 नंबर प्लेटफ़ॉर्मच्या बाहेर पडण्याच्या जुन्या गेटच्या ठिकाणी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत आझादी का अमृत महोत्सव विषयावर चित्रप्रदर्शनी (Exhibition) चे आयोजन करण्यात येणार आहे. ही चित्रप्रदर्शनी (Exhibition) सर्वांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत मोफत राहणार आहे.

आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्रलायाकडील संग्रहीत दुर्मिळ स्वातंत्र्य लढयातिल माहिती व फोटो चित्रप्रदर्शनी (Exhibition) च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याकारिता ह्या चित्रप्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, औरंगाबाद यांच्या पोवाडयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या चित्रप्रदर्शनी साठी शालेय, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.

या चित्रप्रदर्शनी (Exhibition) ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दुर्मिळ माहितीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रलायाच्या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- औरंगाबाद, दक्षिण मध्य रेल्वे, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद तर्फे करण्यात येत आहे.