रक्षाबंधनाच्या दिवशी आजारी बहिणीला नाते आपुलकीची मदत

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.13ऑगस्ट):-आजारी असलेल्‍या बहिणीला नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्‍थेच्या वतीने उपचारासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी आर्थिक मदतीची भेट दिली.गोंडपिपरी तालुक्यातील सुरगाव येथील १७ वर्षीय वैशाली सोयाम ही शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक झाल्याने आजारी पडली. शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतरही तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला खाजगी बेंदले हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

परंतु, मुलीला वडील नाही. आई अंगणवाडीत खिचडी बनवून परिवाराचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बघून सूरगावातील ग्रामस्‍थांनी व गोंडपिपरी तालुक्यातील काहीं दुकादारांनी वर्गणी गोळा करून वैशालीच्या उपचारासाठी मदत केली. पण ही मदत अपूरी पडत असल्‍याने नाते आपुलकीचे बहु. संस्थेला माहिती मिळाली.

माहिती मिळताच संस्थेच्या वतीने तिला दहा हजार रुपयाची तात्काळ मदत करण्यात आली. एका आजारी बहिणीला राखीच्या मुहूर्तावर संस्थेने सहकार्य करीत अनोखी भेट दिली. मदतीचा धनादेश वैशालीच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद तथा चंद्रपूर लोकमत वृत्तपत्रचे उपसंपादक साईनाथ कुचनकर, महासागर वृत्तपत्रचे जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजणे, उपाध्यक्ष किसन नागरकर, सदानंद टिपले, पुंडलीक आरीकर, प्रदीप आडकीने, मंगेश ताजने आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED