राजांची लाडकी राणी आणि आपण?

49

एक काळ असा होता कि आजोबा आणि आजी नातवांना मांडीवर घेऊन झोपविण्यासाठी गोष्टी सांगत. त्यात एक होता राजा आणि त्यांचे टुमदार गांव,किंवा एक होता राजा त्याला दोन राण्या होत्या एक आवडती,तर दुसरी नावडती त्यांची गोष्ट सांगितली कि मुलमुली ऐकता ऐकता झोपी जात असत.दुर्या गोष्टी एक गरीब ब्राम्हण होता तो खूप दयाळू होता आणि गरिबांची सेवा करून खूप दान दक्षिणा घेत होता.अशी गोष्टी प्रत्येक घरा घरातील आजोबा आजी सांगत होत्या. त्यांनी ह्या कोणत्याही शाळांमध्ये शिकल्या नव्हत्या तर त्यांनी ह्या गावच्या चावडीवर ऐकल्या होत्या त्या त्यांच्या डोक्यात कायमस्वरूपी फिट बसल्या होत्या.आता च्या जमान्यात आजोबा आजीला २ बी एच के, ३ बी एच के मध्ये जागा नाही म्हणून खेड्यातील गांवात किंवा वृद्धाश्रमात राहतात. पण मी आज वेगळ्याच राजाच्या लाडक्या राण्यांची गोष्ट लिहत आहे.त्या प्रत्येक माणसांच्या जीवनात असतात.त्यांना किती किंमत द्यावी हे स्वता वर अवलंबून आहे.

एक राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.दुसरी राणी इतकी सुंदर होती की,तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!.तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा!!.पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!.असे करीत असतांना दिवस महिने वर्ष पुढे पुढे जात होते. त्यामुळेच एकाच वेळी चार राण्या आणि राजाचे वय वाढत होते.म्हणजेच राजा म्हातारा झाला होता. तो आता मरणासन्न अवस्थेत असताना त्यांच्या बरोबर कायम राहण्यासाठी कोणी तरी पाहिजे होते. आणि राण्या शिवाय हक्काचे कोणी नव्हते.म्हणूनच त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले,तू माझ्याबरोबर येशील का?.राणी म्हणाली नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे.राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली,मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन. त्यापुढे नाही.राजाला अपार दुखः झालं,त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले,तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही?.तिसरी राणी म्हणाली, नाही. तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एका बरोबर जाणार आहे.आता मात्र राजाच्या दु:खाला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच.

माझे जीवन व्यर्थ घालवले,फुकट वेळ,पैसा,आयुष्य खर्च केले.तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिच्या अंगावर दागिने नव्हते. तिला अंगभर कपडे देखील नव्हते की मूठभर मांस नव्हते. ती म्हणाली,तुम्ही जाल तिकडे मी येईन.स्वर्गात असो की नरकात.कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचन आहे.राजा थक्क होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला की,जिला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही,पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे?.राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला.

कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला?. त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही,पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला? तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत.आपली पहिली राणी, जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले “शरीर!” ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते,ती म्हणजे आपली मुले,आप्तेष्ट,मित्र व “समाज” आपली तिसरी राणी,जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते ती म्हणजे, ‘धन-पैसा’ आपल्या मृत्युनंतर लगेच ती दुसऱ्याची होते. आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्य, कर्म, माणुसकी, धर्म जे आपण सदभावनेने, निःस्वार्थीपणे,आणि विना अहंकाराने करावे,पण ते न करता, आपण जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो.तरी पण ती जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच असते.आज अशी गोष्ट सांगणारी व्यक्ती फुकट मिळत नाही.त्यासाठी ही पैसे मोजावे लागतात.

आजच्या काळात सिनियर केजी,ज्युनियर केजी मध्ये मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी वीस ते तीस चाळीस हजार रुपये कमी जास्त पालकांना प्रवेश घेण्यासाठी भरावे लागतात. तिथे कोणते संस्कार होतात ?.पांचवी ते दहावी पर्यंत शिक्षण प्रवेश फ्री बाकी सर्व माफ म्हणजे मोफत आहे. अकरावी ते पंधरावी पदवी पर्यंत खर्च आहे.पदवी मिळाल्यावर नोकरी मिळेलच यांची खात्री नाही.आणि नोकरी मिळाली तर आपण ज्युनियर केजी ते पदवीधर होण्यासाठी आपल्या पालकांनी जे खर्च केला तो कसा वसूल करावा यांच्याच मागे लागतो.तेच शिक्षण आपल्याला मिळाले असते.त्यावेळी आपणास पुण्यकर्म,कुशल कर्म,माणुसकी,सामाजिक बांधिलकी,सदभावना,निःस्वार्थीपणा,कर्तव्यदक्षता आणि अहंकार आपल्या संस्कारात नसतो.तेव्हा आपल्या जवळ कोणी गरीब मदती साठी आला तर त्याचा प्रचंड तिरस्कार वाटतो.त्यावेळी मदत करण्याची भावना निर्माण होत नाही.तेव्हा पुण्य कर्म,सामाजिक बांधिलकी ,कर्तव्यदक्षता या शब्दाचा अर्थ कळत नाही. नोकरीत असतांना भरपूर पैसे कमाविले असल्यामुळे ते मोठ्या जागृत मंदिरात दान देतांना मनाचा खूप मोठापणा दाखविला जातो.त्याची अधिकृतरीत्या नोंद कुठे ही होत नाही.यांची जाणीव तेव्हा होत नाही.जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा लोकांनी नातलगांनी आपल्या जवळ यावे भेटावे अशी तिव्र इच्छा होत असते.पण सत्यात ते उतरत नाही.

याला कारणच आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्य,कर्म,माणुसकी,धर्म जे आपण सदभावनेने,निःस्वार्थीपणे,कर्तव्यदक्षता आणि विना अहंकाराने करावे,पण ते न करता,आपण जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ देत नसतो.ती चौथी राणी असते. मृत्यू नंतर ती जन्मोजन्मी आपल्या समाजाला,मित्र मंडळीला,नातलगांना बरोबर आठवण देत असते.जन्म दिन,मृत्यू दिन कोणाच्या लक्षात राहत नाही.म्हणूनच राजांची लाडकी राणी आणि आपण?.ही गोष्ट समजून घ्यावी आणि आचरणात आणावी.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९