बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे बीईएफचे संस्थापक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या ६ वा स्मृती दिनानिमित्त अभिवादन

29

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.13ऑगस्ट):-बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे बीईएफ आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक, साप्ताहिक शालवन पत्रिकेचे संस्थापक संपादक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त ९ आगस्ट २०२२ रोजी आमदार निवास,सीव्हिल लाईन्स नागपूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी बीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.रामटेके हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, वर्ल्ड फेलोशीप आठ बुद्धिस्ट, पंचशील सम्यक दान समितीचे सचिव डॉ.प्रा. टी.डी.कोसे,बीईएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.प्रा.चरणदास सोळंके, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे या मान्यवरांनी स्मृती शेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

या कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा बीईएफचे जिल्हाध्यक्ष सुखदेव गावंडे, नागपूर जिल्हा बीईएफचे मधुकर डोंगरे, अमरावती जिल्हा बीईएफ तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, चंद्रपूर थर्मल पॉवर कंत्राटी कामगार युनियनचे अध्यक्ष सुधाकर तेलसे,बीईएफ महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शीवदास कांबळे, चंद्रपूर जिल्हा बीईएफ तर्फे नवनाथ देरकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय शिडाम, आदिवासी समाजातील कार्यकर्ते डी.पी.आत्राम इत्यादी मान्यवरांनी उबाळे साहेबांच्या जिवनावर प्रकाश टाकुन बीईएफला संपूर्ण महाराष्ट्रात वाढविण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन केले.याप्रसंगी प्रविण ऊर्फ बाळासाहेब खोब्रागडे म्हणाले की उबाळे साहेबांनी आंबेडकरी चळवळीकरिता आपलं संपूर्ण आयुष्य वाहिले.त्याना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्य अपेक्षित होते हेच कार्य आम्ही सर्वांनी मिळून पुढे नेले पाहिजे.सिद्धार्थ सुमन म्हणाले की, आमच्या सारख्या त्या वेळेच्या तरूणांना उबाळे साहेबांनी नेतृत्व करण्याची संधी मिळवून दिली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष येथिल तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले .डॉ.प्रा.टी.डी.कोसे म्हणाले की, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन या ट्रेड युनियनची आज सर्वांना गरज आहे केवळ महाराष्ट्रातच राहुन चालनार नाही तर संपूर्ण भारतात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन गेली पाहिजे. डॉ‌. प्रा.चरणदास सोळंके यांनी देखील बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनला अधिक गतिमान करण्यावर भर दिला.राजकुमार जवादे या प्रसंगी म्हणाले की बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ही फुले आंबेडकरी विचार धारेवर चालनारी देशातील एकमेव अशी ट्रेड युनियन आहे,जी इंडियन ट्रेड युनियन एक्ट १९२६ अंतर्गत रजिस्टर्ड आहे त्यामुळेच आम्ही अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.अध्यक्षस्थानावरुन बोलताना आर.डी.रामटेके म्हणाले की उबाळे साहेब हे एक त्यागी आणि निस्वार्थी असे नेते होते त्यांनी आपल्या कृतीतून आंबेडकरी चळवळीला गतीमान केले.या अभिवादन सभेचे प्रास्ताविक बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य सिद्धार्थ डोईफोडे यांनी, संचालन महासचिव डॉ.प्रा.रविकांत महींदकर यांनी तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष प्रा.अशोक ढवळे यांनी केले.भर पावसांत देखील संपूर्ण विदर्भातून बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते