स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त पालिकेकडुन स्वातंत्र सेनानींचा सन्मान

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13ऑगस्ट):-स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जेष्ठ क्रांतिकारी हरि गोविंद रसाळ यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई रसाळ यांचा तिरंगा, सन्मानपत्र, व वृक्ष हाती देवुन सन्मान करण्यात आला.स्वातंत्र्य पुर्व काळात डॉ. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत महत्वाची भुमिका बजावणार्या क्रांतीकारकात म्हसवड येथील हरि गोविंद रसाळ अग्रक्रमाने घेतले जाते, त्यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई रसाळ यांनीही त्या लढ्यात सहभाग घेतला होता, आज त्यांचे वय हे नव्वदीपार असले तरी ही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. यंदा देशभर ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यामुळे यंदा चा हा स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणुन साजरा होत आहे, यंदाचा स्वातंत्र दिन हा संपूर्ण देशात ७५ वा अमृत महोत्सव दिन म्हणुन मोठ्या उत्साहात साजरा होत असुन यानिमीत्ताने हर घर तिरंगा अभियान दि.१३ पासुन देशभर राबवले जात आहे.

या अभियानांतर्गत प्रत्येक नागरीकाने आपल्या घरी तिरंगा उभारण्याचे आवाहन ही पालिकेच्या वतीने करण्यात येवुन पालिकेत नागरीकांना तिरंगा ही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अमृत महोत्सवानिमीत्त प्रत्येक नागरीकांनी दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट या कालावधीत आपल्या घरी तिरंगा उभा करुन या अमृत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय पातळीवरुन करण्यात आले आहे.

नेमके याचे औचित्य साधत म्हसवड पालिकेने शहरातील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी हरि गोविंद रसाळ यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई रसाळ यांचा त्यांच्या घरी जावुन सन्मानपत्र, तिरंगा, शाल, श्रीफळ व वृक्ष देवुन सन्मान केला यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सुवर्णा फल्ले, शितल गुजर, सुप्रिया पवार, चैतन्य देशमाने, शिवराज भोसले, सागर सरतापे, निसार मुल्ला रज्जाक शेख, अनिता करांडे यांनी श्रीमती रसाळ यांच्या शी गप्पा मारताना आझाद हिंद सेनेतील त्यांचे पती हरि गोविंद रसाळ यांच्या कर्तबगारीविषयीची माहिती जाणुन घेतली, यावेळी शिवदास रसाळ, विनोद रसाळ माजी नगरसेविका रंजना रसाळ या सह त्यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED