हर घर तिरंगा नको ,हर घर रोजगार द्या

35

🔸सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांचे आवाहन

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.13ऑगस्ट):-आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष येणाऱ्या 15 ऑगस्टला पूर्ण होणार आहेत म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे.हर घर तिरंगा तर ठीक आहे पण हर घर रोजगार कधी मिळणार?हर घर तिरंगा अभिमान राबविण्यात येत आहे पण ज्या व्यक्तीकडे घरच नाही तर ते कुठे तिरंगा लावतील याचे सुद्धा उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्याला पाहिजे.देशाचा तिरंगा संपूर्ण भारतीयांच्या मनात आहे आणि यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही ,प्रमाणपत्र देण्याची गरज त्या लोकांना आहे ज्यांनी 52 वर्ष स्वतःच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही.आरएसएस या संघटनेने त्यांच्या नागपूर येथील कार्यालयावर स्वतंत्र मिळाल्या नंतर 52 वर्ष तिरंगा फडकवला नाही आणि त्याच संघटने सोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी आरएसएस ला आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याचा सल्ला द्यावा असे मत जनकल्याण फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले.

वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग या सर्व मुद्यावर उठणारा आवाज बंद करण्यासाठी हर घर तिरंगा अभिमान राबविण्यात येत आहे कारण जेव्हा जेव्हा जनता वरील मुद्यावर आवाज उठवतात त्यावेळेस जनतेला धर्म तथा नकली देशभक्तीचा नशा चढविल्या जातो.2014 मध्ये देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी 2 करोड रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते आता मोदी यांच्या कार्यकाळाला 8 वर्ष पूर्ण होत आहे तरीही अजून पर्यंत भारतीय बेरोजगारांना 16 करोड रोजगार मिळाले नाही ,रोजगार तर मिळाले नाही पण कोरोना काळात 5 लाख लोकांचे रोजगार गेले ही सुद्धा रिपोर्ट आली होती.हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून जनतेला मूर्ख बनवून असली मुद्यावरून दुर्लक्ष करण्याच काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे असे देखील रेवतकर म्हणाले.

तिरंगा जनते पर्यंत पोहचविण्यासाठी जनतेकडून 25 रुपये घेतल्या जात आहे मात्र निवडणुकीच्या वेळेस दारू फुकट वाटप करतात तर यावरून समजायला येते की देशभक्ती पेक्षा यांना स्वतःच्या फायद्याची भक्ती अधिक प्रिय आहे.हर घर तिरंगा अभियाना साठी तिरंगा बनविण्याचे ऑर्डर गुजरात येथील उद्योगाला दिले आहे आणि मोदीजी म्हणतात की स्वतःच्या व्हाट्सआप डीपी वर तिरंगा ठेवा तर हा सल्ला फक्त इतर राज्यातील जनतेलाच आहे का कारण तिरंगा बनविण्याचे सर्व ऑर्डर गुजरात येथील उद्योगाला दिले आहेत तर यावरून मोदीजी यांची वेगळी नीती इथे आपल्याला दिसून येते त्यामुळं देशातील जनतेनी त्यांच्या नीतीचे शिकार न होता स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून हर घर तिरंगा नाही तर हर घर रोजगार ची मागणी सरकार ला करावी असे आवाहन पियुष रेवतकर यांनी केले.तिरंगा सर्व भारतीयांच्या मनात आहे तसेच माझ्यादेखील मनात आहे मात्र जनतेची दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात मी नेहमी बोलत राहणार जरी मला देशद्रोही म्हटले तरी चालेल आणि जनतेच्या हितासाठी मी असे द्रोह वारंवार करणार असे मत पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले.