वेदांत विद्या मंदिरात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात

🔹महापुरुषाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे , देशात हर घर तिरंगा हे अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येत आसुन प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याची मोहीम परभणी जिल्ह्यात सुरू आहे’घरोघरी तिरंगा’ लावताना काय काळजी घ्यावी, तिरंग्याचा मान राखला जावा, यांची काळजी नागरिका कडुन घेतली जात आहे.

13 ऑगस्ट रोजी वेदांत विद्या मंदिर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लक्ष्मीनगर, विद्यानगर, परळी रोड मार्ग रॅली काढून ध्वजाचे ध्वजारोहण करून महापुरुषाची वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान करून आजादी का अमृत महोत्सवास सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED