नागभीडच्या आंगणवाडीत बालगोपाल पंगत संपन्न

🔹भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्य विविध उपक्रम 

✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागभीड(दि.14ऑगस्ट):-भारताला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल संपुर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेने अमृत महोत्सवी अभियानाअंतर्गत विविध उपक्रम साजरे केल्या जात आहेत. नागभीड येथील दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ला आंगणवाडीत बाल गोपाल पंगत आयोजित करण्यात आली होती.

आंगणवाडी क्र. २ व ८ मध्ये संयुक्तपणे झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन नागभीड पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी कु. प्रणाली खोचरे गायकवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे , माजी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे व पं.स. चे ज्येष्ठ सहा (लेखा) अजय दलाल यांची उपस्थिती होती. यावेळी या दोन्ही आंगणवाडीतील लाभार्थी विद्यार्थ्यांना लोकसहभाग मधून केळी व पोषक नाश्ता देण्यात आला . या माध्यमातुन लहान मुलांना सकस आहाराचे महत्व पटवून देत पालकांनी आपल्या पाल्यांच्या उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे सकस आहाराचे सेवन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.

यानंतर घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत उपस्थित अतिथी , कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हातात तिरंगा ध्वज देऊन भारतमातेचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी बालविकास प्रकल्प नागभीड चे कनिष्ठ सहाय्यक संदिप उईके , आंगणवाडी सेविका सौ. ज्योत्स्ना गजानन वाकडे व सौ. नंदाताई गिरीधर अमृतकर तसेच आंगणवाडी मदतनीस श्रीमती माया गंगाधर शेंडे व सौ. यशोधरा नामदेव सहारे यांनी अथक प्रयत्न केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED