राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियान

37

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.14ऑगस्ट):-गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात सकाळी ८.१५ वाजता महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत १३ ऑगस्टला सकाळी ९.०० वाजता महाविद्यालय- तहसील- हुतात्मा स्मारक ते परत महाविद्यालय अशा मार्गाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभातफेरीत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. यावेळी हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. प्रभातफेरीला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. कार्तिक पाटील, चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड, चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोरते यांनी संबोधित केले.

या रॅलीचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय छात्र सेनाचे लेफ्टनंट डॉ. प्रफुल्ल बन्सोड, वरिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे, डॉ. नितिन कत्रोजवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुणवंत वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या रॅलीत वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.