कलश महिला ग्राम संघ, गिलबिली (चंद्रपूर) द्वारा आयोजित सलाम किसान च्या सौजन्याने “महिला सक्षमीकरण” तसेच “शेती विषयक उत्कृष्ट कामगिरी”करणाच्या शेतकरी वगाचा सत्कार

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14ऑगस्ट):-सलाम किसान च्या सौजन्याने कलश महिला ग्राम संघ, गिलबिली (चंद्रपूर ) द्वारा आयोजित “महिला सक्षमीकरण” तसेच “शेती विषयक उत्कृष्ट कामगिरी” करणाच्या शेतकरी वगाचा सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सलाम किसान संस्थापक कु. धनश्री योगेश मानधनी लाभल्या होत्या. त्या मुळच्या भारतातल्या पण शिक्षण अमेरिकेत घेत असताना त्यांना आपल्या भारतातील शेतकरी वर्ग व महिला वर्गासाठी काही तरी केल पाहिजे अशी इच्छा मनात आली. त्यातूनच त्यांनी एक चळवळ चालू केली ती म्हणजे “सलाम किसान”.

सलाम किसान मार्फत त्यांना लोकांन पर्यंत शेतीतील नव नविन तंत्रज्ञाना बदल जनजागृती करायची आहे तसेच गावातील तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे व महिला वर्ग ज्यांना काम मिळत नाही किंवा घरीच्या परिस्थितीमुळे बाहेर जाऊन काम करू शकत नाही त्यांच्यासाठी घरीच काम मिळवून द्यायच आहे. हा विचार करत असतानी त्यांच्या लक्षात आल की आपण सुरवात आदिवासी वर्गापासून केली पाहिजे. जेणे करून त्या गावातील तरुण वर्गाला रोजगार मिळेल, शेतकऱ्यामध्ये जनजागृती करता करता येईल तसेंच तेथील महिलांना घरच्या घरी काम मिळेल व त्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि एकंदरीतरीत्या आदिवासी वर्गाला वर आणता येईल म्हणूनच त्यांनी आपल्या चळवळीची सुरवात आदिवासी भागातील एक छोट्याश्या गाव गिलबिली (चंद्रपूर) येथून सुरवात केली. त्या गावात जाऊन त्यांनी गावातील लोकांच्या कोणत्या समस्या आहे हे जाणून घेतले.

गावातील तरुण वर्गाला व महिलांना रोजगार कसा मिळवून देता येईल या वर पण चर्चा केली. तसेच शेती करताना त्यांना काय काय अडचणी येतात त्या वर कश्या प्रकारे मात करता येईल हे सुद्धा सांगितले. सलाम किसानच्या मार्फत शेतकऱ्याला ड्रोन चा शेतात कसा उपयोग होऊ शकतो फवारणीसाठी त्याचा प्रत्यक्षरित्या दाखवल. गावातील तरुण वर्गाचा तसेंच महिलांचा उत्साह खूप होता आणि येणाऱ्या संधीचा लाभ घेण्याची पूर्व तयारी सुद्धा होती. तसेच सलाम किसान ने या कार्यक्रमातून तरुण वर्गाला व महिलांना रोजगार सुद्धा मिळवून दिला.

कार्यक्रमाला कु. धनश्री मानधनी (MD, सलाम किसान), प्रद्युमन मानधनी (Co -founder, सलाम किसान), हर्ष मानधनी, हजर होते. तसेच,अक्षय खोब्रागडे (चिफ ऑपरेटिंग ऑफिसर), परेश कुलरकर (ऍग्री आपरेशन मॅनेजर) व सुमित मुंगले (डिजिटल मीडिया मॅनेजर) उपस्थित होते.