पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी माजी जि.प‌. सदस्य प्रमोद चिमुरकर थेट शेताच्या बांधावर

30

🔹ब्रम्हपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार नुकसानभरपाई देण्याची केली मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14ऑगस्ट):-गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीच्या पात्रात करण्यात आला. सोबतच ब्रम्हपुरीचे तालुक्यात सतत 3 दिवस मुसळधार पाऊस होता. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे पाणी ब्रम्हपुरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये व शेतात शिरले. त्यामुळे धान, सोयाबीन, तुर पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या शेतकरी बांधवांना धीर देत शेतातील शेतपिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये जात गावांतील पडझड झालेल्या घरांची व रूई, किन्ही व हळदा शेतशिवारातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.आतापर्यंत ब्रम्हपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले नसल्याने राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करण्यासाठी कार्यवाही करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यशासनाने प्रती एकर 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी केली आहे.सोबतच पिक विमा कंपन्याना सुध्दा ब्रम्हपुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने विमा कंपन्यानी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, रूईचे उपसरपंच ज्ञानेश्वर बुल्ले, ग्रा.पं. सदस्य उत्तम बनकर, किन्ही येथील पुंडलिक प्रधान, उपसरपंच शंकर कोपुलवार, अशोक भुते, विलास धोटे, गुरूदेव सोंदरकर, जिवन ठेंगरी, अनुप प्रधान, सुनिल राऊत, वेदप्रकाश दर्वे, प्रशांत बावणे, गंगाधर धोटे, रुपेश भर्रे, क्रिष्णा प्रधान, राजेश बावणे, ज्ञानेश्वर बगमारे, दामु दर्वे, मधुकर बुल्ले, हळदा येथील ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर झरकर, सचिन बदन, ग्रा पं. सदस्य सुरेखा राऊत, सरपंच दौलत गुरपुळे, धनराज लोणारे, सुरेश नखाते यांसह शेतकरी बांधवांची यावेळी उपस्थिती होती.