विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.15ऑगस्ट):-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर येथे ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ. अलका भिसे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, नवनवीन ज्ञान माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी ग्रंथालय विभागातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जातात. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकरिता वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता विविध पुस्तके, नियतकालीके, मासिके ग्रंथालयातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व हारार्पणाने करण्यात आली. यानंतर अतिथींचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अलका भिसे यांचे स्वागत डॉ. योगेश गवळी यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रतिभा महल्ले यांचे स्वागत श्री निलेश पडोळे यांनी केले. यानंतर ग्रंथालय प्रमुख डॉ. नितेश चोरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, यामध्ये त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच महाविद्यालयात झालेले आधुनिक बदल इ-लायब्ररी तसेच उपलब्ध नवीन पुस्तके याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ. अलका भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विशद केले. नवनवीन तंत्रज्ञान जरी आले तरी वाचनाचे तसेच ज्ञानार्जनाचे महत्त्व अबाधित राहील असे त्यांनी नमूद केले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी मांडलेल्या सिद्धांताचे आजही महत्त्व आहे असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगेश गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. दशरथ काळे यांनी मानले व कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED