श्रावणी पर्वा निमित्त आर्य समाज मंदिरात कार्यक्रम

67

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.15ऑगस्ट):- रोजी शहरातील अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी आर्य समाज मंदिरात श्रावणी पर्वा निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वैदिक हवन (यज्ञ), सत्संग, प्रवचन ,स्वाध्याय तथा भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. वैदिक यज्ञाचे पौरोहित्य आर्य समाज परळी येथील प्राचार्य डॉ. वीरेंद्र शास्त्री व महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मुख्य व्यवस्थापक रंगनाथ तिवार यांनी केले.

तसेच या कार्यक्रमासाठी माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, बजरंग दलाचे संजय लाला आनावडे तसेच आर्य समाज गंगाखेडचे प्रधान सागर राठोड, मंत्री जयप्रकाश राठोड मुख्य संयोजक राहुल राठोड, निलेश राठोड, राजेंद्र राठोड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मप्रकाश राठोड, शिरीष राठोड, प्रभा, साधना, शितल, रेणुका, नम्रता, सोनम, करिष्मा, शौर्या, समर्थ राठोड आदींनी प्रयत्न केले.