लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमी. कंपनी येथे ध्वजारोहण उत्साहात कार्यक्रम

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.15ऑगस्ट):- लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीत सोमवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी नायब तहसीलदार संचीन खंडाळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रगीत गाऊन तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली.मुख्य अधिकारी संचिन खंडाळे यांचे शाल,श्रीफळ देऊन यांचे स्वागत कंपनीचे युनिट प्रमुख संजय कुमार यांनी केले.यांच्यासह मंडळ अधिकारी किशोर नवले उपस्थित होते.१५ ऑगस्ट सर्वांसाठी खास असणार आहे, कारण घरोघरी तिरंगा लावत अमृत महोत्सव साजरा होत आहे.

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात, आपल्या प्रियजनांना याबद्दल आठवण करून देणे सहाजिकच आहे. तर आपणही ७५ वा स्वातंत्र्योत्सव साजरा करूया आणि सर्वांना शुभेच्छा देऊया.

यावेळी कंपनीच्या युनिटचे प्रमुख श्री. संजय कुमार, प्रकल्प प्रमुख श्री. दिनेशकुमार पाटीदार, एच.आर विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष गुणाकर शर्मा,देवनाराण गुप्ता,राधेश्याम गांधी, प्रमोद नाकाडे, धनंजय सागळुले व कामगार, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED