साताळी येथील जिल्हा परिषद शाळेत ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला

33

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.16ऑगस्ट):- जिल्हा परिषद शाळा साताळी येथील शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने शाळेत १३ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, अशा स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या त्या मध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.त्या नंतर आज सकाळी ७५ व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.माजी शिक्षक हरिभाऊ सोनवणे यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .

इयत्ता पहिली ते चौथी या लहान गटामधे वक्तृत्व स्पर्धा मध्ये सोहम सोनवणे इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला व मोठ्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी या गटात सिद्दीका संदिप सोनवणे हिने पहिला क्रमांक पटकावला या दोघांचेही शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ,सर्व समिती, सरपंच व शिक्षक यांनी बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या.

अशा प्रत्येक वर्गातून क्रमांक काढून सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले.शाळेत ‘मी ज्ञानी होणार’ हा देखील उपक्रम राबविण्यात येत आहे.अमृत महोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी शिक्षकवृंद मुख्यध्यापिका नागपुरे मॅडम , लांडगे सर, वाडेकर सर, आहेर सर, पगार मॅडम, पारखे मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समिती व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.