पळसगाव येथील जबरानजोत शेतक-याना भूमिहीन करू नये

28

🔸महामहीम राज्यपालांना ई- मेल द्वारे पाठविले निवेदन

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर (४ जुलै) : वनविभागाच्या पडीत जमिनी कसून शेतकरी आपल्या कुटुंबाची उपजीविका गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या महिन्यात वनविभाग चंद्रपूरचे उपसंचालक (बफर) यांनी अतिक्रमण असल्याचे दाखवुन शेतका-याना शेतजमीनीवरून बेदखल करण्याच्या कारवाईला प्रारंभ केला आहे. या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पळसगाव (पि.) येथील जबरानजोत शेतक-यानी थेट महामहीम राज्यपालांना इ-मेल द्वारे निवेदन पाठविले आहे.

शेतक-यानी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पूर्वी वनजमिनीवर शेती कसलेली आहे. त्या जमिनीचे पट्टे मिळण्यासाठी वनदावे तहसीलदार चिमूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर केले होते. परंतु आजतागायत एकही वनदावा मंजूर झालेला नाही. या महिन्यात वनविभाग चंद्रपूरचे उपसंचालक (बफर) यांनी शेतक-यानी कसलेल्या शेतजामिनीवर जेसीबी, ट्रकटर चालविणे सुरु केले आहे. त्यामुळे शेतका-यावर उपासमारीची पाळी आली आहे. वनविभागाने सुरु केलेली कारवाई थांबविण्याचे निर्देश सबधीत यंत्रणेला देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातुन केली आहे.

सदर निवेदनावर पळसगाव वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर गजभिये, मोतीराम शेंडे, मंगल ठाकरे, सुरेश ठाकरे, अनिल कावळे, कांताबाई गजभिये, नामदेव निकुरे, बाटवू शेंडे, वासुदेव गायकवाड, शामराव रामटेके, गोविंदा रामटेके, दिगांबर आसुटकर, गजानन रामटेके, श्रावण रामटेके, उद्धव रामटेके आदीने स्वाक्ष-या केल्या आहेत.