सडोली खा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव रक्तदान करून साजरा

83

✒️सडोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सडोली(दि.16ऑगस्ट):- खा येथील भीमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कै.संकेत बबन कांबळे याच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.रक्त संकलन सी पी आर हॉस्पिटल मार्फत करण्यात आले.

उपक्रमाच्या सुरवातीस प्रथम तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व शिबिराचे उदघाटन सडोली खा चे सरपंच अमित पाटील ,पोलीस पाटील पंकजकुमार पाटील, स्वरूपसिंह पवार पाटील, व मंडळाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करणेत आले.

यावेळी प्रा. पवन पाटील यांनी युवकांनी मोबाईल चा अति वापर न करता असे देशोपयोगी उपक्रम राबवावेत. आई वडिलांच्या कष्टाचा विचार करून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत रहा. असे आवाहन केले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी-विनय कांबळे, सचिन कांबळे, प्रबुद्ध कांबळे, भूषण कांबळे व मंडळाचे कार्यकर्तेयांनी विशेष प्रयत्न केले.रक्तदात्यांचे स्वागत डॉ एकनाथ कांबळे यांनी तर आभार बबन कांबळे यांनी मानले.