कमळवेल्ली येथील स्तवन अमोल ठाकरे या सात वर्षीय बालकाचे स्टेज डेअरिंग

🔸देशभक्तीच्या भाषणातून आपल्या करिअरचे मार्गही स्पष्ट

✒️सुनील शिरपुरे(विशेष प्रतिनिधी)

झरीजामणी(दि.16ऑगस्ट):-बोलणं ही समोरच्यावर प्रभाव पाडणारी कला आहे. आपल्या बोलण्यावरून समोरचा आपल्याबद्दलचं मत तयार करतो. करिअर म्हणून नाही, तर व्यवहारात सगळ्याच ठिकाणी संवाद कौशल्य आवश्यक असतं. कधी स्टेजवर जाऊन, तर कधी चारचौघांमध्ये बसून बोलण्याची गरज पडते. त्यावेळी आपल्यात स्टेज डेअरिंग म्हणजे सभाधीटपणा किती आहे? हे लक्षात येतं. एखादा मुद्दा व्यवस्थितपणे आपण मांडू शकता की नाही, श्रोत्यांवर आपल्या बोलण्याचा प्रभाव पडतो की नाही, हे सगळं आपण किती व्यवस्थित बोलता? यावरच अवलंबून असतं. अर्थात हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. भाषणशैली ही प्रत्येकालाच उपजत नसते. ती अवगत करावी लागते. भाषण म्हटलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटत असतो. मुळात प्रत्येकाला मंचावर जाण्याचं धाडसही होत नाही.

त्यातल्या त्यात काही धाडस करून जातात, परंतु मंचावर गेल्यावर थरकाप उडतो आणि काय बोलावं काय नाही? हे सुचतच नाही. मग मध्येच अडखडतात नि भाषणात खंड पडत असतो. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभ पर्वावर कमळवेल्लीच्या जि.प.व.प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गातील ७ वर्षीय विद्यार्थी स्तवन अमोल ठाकरे या बालकाने ग्रामपंचायतच्या प्रांगणात हे स्टेज डेअरिंग अगदी सहजरीत्या पार पाडले. तेही न अडखडता व न खंड पाडता. समजा तो अडखडला असता किंवा आपल्या भाषणात खंड पाडला असता, तरी त्याचं स्टेज डेअरिंग हेच महत्त्वाचं होतं.

अगदी अल्प वयात खूप सा-या लोकांच्या समोर हे कौशल्य पार पाडणं म्हणजे साधी गोष्ट नाही. अगदी चांगल्या चांगल्या लोकांना लाजवेल असं त्याचं भाषण होतं. त्याच्या या भाषणशैलीचं व स्टेज डेअरिंगचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याच्या या भाषणातून त्याने आपली प्रतिभा तर दाखवून दिलेच आहे. शिवाय त्याचे भविष्यातील करिअरचे मार्गही स्पष्ट केले. त्याचं हे स्टेज डेअरिंग पाहता, त्याने यात सातत्य जोपासले, तर तो भविष्यात उत्तम वक्ता होऊ शकतो किंवा उत्तम ॲंकरींग करू शकतो यात काही शंकाच नाही. त्याला आपण सर्वांच्या आशीर्वादासह भावी वाटचालीच्या अगणित हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED