नागरीकांनी ही देश प्रेमास व विकासास हातभार लावावा- (वीर जवान) नितीन आहेर यांचें उपस्थितांना आव्हाहन

30

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.16ऑगस्ट):-सातपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात आपण पदार्पन केलय,सर्वांनी मागे वळून व पुढेही भविष्याचा वेध घेऊन सजगता सावधानता बाळगून‌ आपण एवढ्या वर्षांत बरंच काही मिळवलंय.पण यापुढेही आपण दुरदृष्टीने आपल्या भारतदेशा बद्दल आपुलकी,प्रेम,जिव्हाळा जपला पाहिजे,वैयक्तिक कुठे काय कमतरता तीथ आम्ही खंबीरपणे उभं राहून‌ माझ्या कडुन देशाकरीत समाजाकरीता काय करता येईल ते कार्य मी केल पाहिजे अर्थात देशप्रेमाची व विकासाची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे,असे जम्मु काश्मिर येथे सैन्यदलात पण सध्या घरी सुट्टीवर आलेले वारकरी महामंडळ नाशिक अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांचे जेष्ट चिरंजीव वीर जवान श्री नितीन आहेर यांनी काढले. सावरकर नगर येथील जनसेवा पुर्ती फाऊंडेशन व जीवनश्रध्दा जेष्ट नागरीक संघ यांचे विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन वीर जवान श्री नितीन आहेर यांचे हस्ते पार पडले,यावेळी श्री हनुमान मंदिरात प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,स्वच्छता, वृक्षारोपण,जलप्रदूषण,वायुप्रदूषण,गरीबाप्रतीओलावा,भ्रष्टाचार,अनाचार,सर्व धर्म समभाव,आदर्श कर्तृत्ववान,उच्च शिक्षणाची गोडी, सामाजिक बांधिलकी,नैतिक मूल्य यांची जाणीव व त्याकरीता समाज व देश कार्यासाठी सर्वांनी एकत्रआलं पाहिजे असेही श्री नितीन आहेर म्हणाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवापुर्ती चे अध्यक्ष हभपश्री पुंडलिक काका देव्हारे होते.व्यासपीठावर श्री समाधान देवरे,श्री बाळासाहेब जाधव, हभपश्री रामचंद्र महाराज पळवे,जीवन श्रध्दा जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष हभपश्री नारायण महाराज पवार,आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रमुख अतिथी व दत्तात्रय उशीर,श्री. एकनाथ जोशी हभप श्री शिवाजी महाराज शिंदे, कु.प्रतिक्षा आहेर यांची भाषणे झाली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभपश्री देवा वाघ, प्रस्तावना उपाध्यक्ष श्री नवल घरटे,श्री.बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले, निकुंभताई, सौ.जिजाबाई आहेर, हभप धुमाळ मावशी,सौ.पुष्पा आहेर, कु.प्रतिक आहेर,श्री.हभप विश्वनाथ कवडे, श्री.हभप साहेबराव काळे, हभपश्री.दामोदर पाटोळे, हभपश्री देवाजी सोनवणे,हभपश्री सुभाष शेवाळे, हभपश्री विष्णु काठे व ओम महारुद्र हनुमान भजनी मंडळ,महिला हरिपाठ मंडळ सह परीसरातील ग्रामस्थ कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.