


🔸कुरुल ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच सौ चंद्रकला माणिक पाटील हस्ते
✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)
कुरुल(दि.16ऑगस्ट):; 15 ऑगस्ट हा दिवस भारतीयांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा दिवस, स्वतंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव निमित्त कुरुल ग्रामपंचायत मध्ये सजावट करण्यात आली कुरुल ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण कुरुल गावच्या प्रथम नागरिक व सरपंच सौ चंद्रकला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रगीत ,ध्वज गीत, न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनींनी यावेळी पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे, प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे मुख्याध्यापक मुचंडे, शिक्षक , शिक्षिका , विद्यार्थी, व न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य रेपाळ, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, मेजर लिंगेश्वर निकम, मेजर बाळासाहेब माळी, मेजर राजाराम ननवरे, कुरुल गावचे उपसरपंच पांडुरंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे, गहीनाथ जाधव,भारत जाधव,बाबा जाधव, डॉ. दत्तात्रय कदम, वसंत जाधव, पत्रकार महेश कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्या अंजली गायकवाड, रोहिणी तगवाले ,पाटकर मॅडम ग्रामपंचायत क्लार्क संतोष जाधव, अमोल खंदारे, कर्मचारी खाजाभाई शेख, संभाजी घोडके, सुनील गायकवाड, आदीसह कुरुल ग्रामस्थ उपस्थित होते.




