मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत वृक्षारोपण

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17ऑगस्ट):-दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी येथील लोकशा नगरात मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवस व जिल्ह्यातील आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी परभणीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी लोकाशा नगरात पार पडली. बैठकीत मरडरसगाव जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते नारायणराव घनवटे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष यादव यांनी टोपी घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

त्यानंतर लोकाशा नगरात असलेला हनुमान मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर यादव, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर ,जिल्हा सचिव ऍड एस बी चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल बुधवंत, सेलू तालुकाध्यक्ष राधाकिशन कदम, पूर्णा तालुका अध्यक्ष नामदेव बोबडे, परभणी तालुकाध्यक्ष नागनाथ चव्हाण, सोनपेठ तालुकाध्यक्ष जयवंत यादव, नारायणराव घनवटे, सेलू तालुका संघटन मंत्री अनिल वाटोडे,वालुर जी प सर्कल प्रमुख श्याम बोडखे,रवळगाव जी प सर्कल प्रमुख गणेश वाघ सह ,दत्ता सावळे, नागनाथ सावळे सहजिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED