कुभेंझरी ग्रामपंचायतीमधील बंजारा तांडा विकासापासून दूर

27

🔸प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या आरोप

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17ऑगस्ट):-ग्रामपंचायत कुंभेंझरी अंतर्गत बंजारा तांड्यातील नाली चे बांधकाम ग्रामपंचायत ने केले नसल्याने सतत च्या संततधार पावसाने घरामध्ये पावसाळ्याचे पाणी घुसल्यामुळे घरातील जीवनउपयोगी वस्तू भिजून खुप मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जिथे आवश्यकता नाही त्यां ठिकाणी केवळ राजकारणाच्या पोटी गाव पुढाऱ्यांनी गावात जिथे नालीची आवश्यकता नाही तिथे नालीचे बांधकाम केले आहे.

लोकप्रतिनिधी स्वार्थापोटी स्वतःच्या घरासमोर आवश्यकता नसतांना नालीचे काम केल्याचे वृत्त आहे. केवळ सुडबुद्धीच्या राजकारपणा पोटी अशिकक्षित, गरीब जनतेच्या डोळ्यात ” धूळ झोकून बंजारा तांड्यातील लोकांसोबत दुजाभाव केला असा प्रश्न बंजारा तांड्यातील लोकांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायत च्या हालग्रजी पणामुळे गावात सद्या रोगाचे प्रमाण वाढले असून याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे तांड्यातील लोकांचे म्हणे पडले आहे नाली अभावी गावात रोगाचे प्रमाण वाढले आहे.