स्वतंत्र भारतातील जातीवाद किती दिवस चालणार ? -भारतीय विद्यार्थी मोर्चा

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.१७ऑगस्ट):-रोजी मुंबई जिल्हा कलेक्टर यांच्या माध्यमातून भारताच्या राष्ट्रपती महोदय यांना “भारतात ब्राम्हणांनी बनवलेल्या जातीव्यवस्थेमुळे राजस्थान जालौर जिल्हा सुराणा गावातील इंद्र कुमार मेघवाल या नऊ वर्षीय लेकराला त्याच्या शाळेतील उच्च जातीच्या प्राध्यापकाच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून भयानक मारहाण केल्यामुळे १३ ऑगस्ट रोजी त्या लहान लेकराचा मृत्यू झाला आहे.” त्या संदर्भात भारतीय विध्यार्थी मोर्चा च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

निवेदन देत असताना मा.सुमित शिंदे (राज्य महासचिव हॉस्टेल एवं अभ्यासिका BVM महाराष्ट्र) यांच्या माध्यमातून घडलेल्या घटनेवर वक्तव्य करण्यात आले.

एकीकडे भारतात ७५ व्या आझादीचा अमृत महोत्सव भारत सरकार साजरा करत आहे तर दुसरीकडे आझाद भारतात अमृत तर नाही पण पिण्याच्या पाण्यासाठी पण संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे संविधान जंगलातील प्राण्यांना मारण्याला सुद्धा परवानगी देत नाही तर दुसरीकडे जिवंत माणसाला जीव जाईपर्यंत मारलं जात आहे. NCBR नुसार भारतात sc, st, obc, मायनॉरीटी व महिलांवर प्रत्येक दिवसाला अत्याचार होत आहे ज्याचा आकडा भारत सरकार साठी लाजिरवाना आहे. आणि ही भारतीय जनतेसाठी खूप गंभीर बाब आहे.सध्याची स्थिती पाहता भारतीय विद्यार्थी मोर्चा ने खालील मागन्या प्रशासना समोर ठेवल्या आहेत, जर का या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण भारत देशात आंदोलन उग्र केलं जाईल.

१. हत्यारा अध्यापक छैलहसिंह याला सरकार द्वारा ऑफिसर स्कीम च्या माध्यमातून त्वरीत फासीची शिक्षा द्यावी.
२. मृतक च्या परिवाराला 1 करोड रुपये आर्थिक मदत ताबडतोब द्यावी.
३. मृतक परीवाराच्या एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी.
४. प्रायव्हेट शाळेची मान्यता रद्द करावी.

निवेदन देण्यासाठी मा.नितीन महाडिक राज्य उपाध्यक्ष BBM महाराष्ट्र, मा.प्रमोद साळवी जिल्हा उपाध्यक्ष BBM, मा.आकाश वसावे जिल्हा संयोजक RACS मुंबई, मा.अमोल सर BYM ठाणे जिल्हा, मा.राज नारायण जैस्वार जिल्हा संपर्क प्रमुख मुंबई BBM इ. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED