दहिदूले ता धरणगाव – जि प प्राथमिक शाळा दहिदुले येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

24

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा दहिदुले येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. दहिदुले गावातील भारतीय तटरक्षक दलात नाविक या पदावर कार्यरत असलेले श्री भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, गावात प्रभात फेरी ने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री भूषण पोपटराव अहिरराव यांनी केले ध्वजारोहण प्रसंगी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन भाऊ पाटील उपस्थित होते.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भाऊ धनगर, ग्रामपंचायत सदस्य सौ गुमनबाई गायकवाड व गोकुळ आबा पाटील, श्री एकनाथ गायकवाड,श्री मनोहर पाटील, श्री सुनील पाटील, बबलू पिंजारी,श्री दगडू पाटील श्री मोहन कोळी श्री सागर पाटील, शरीफ पिंजारी श्री दीपक धनगर, श्री देवीदास पाटील श्री नारायण पाटील तसेच श्री सुरेश सोनवणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावातील सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक हजर होते कार्यक्रमानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील उपशिक्षक श्री उगलाल शिंदे यांनी केले गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सुदर्शन भाऊ पाटील यांच्या हस्ते मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुण मित्र मंडळ यांनी अनमोल सहकार्य केले