पालकत्व गमावले आहेत अशा गरजू मुलां/मूलीसाठी शैक्षणिक साहित्य वाटप

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17ऑगस्ट):-गंगाखेड येथील भोलारामजी कांकरिया बहु उद्देशिय चेरिटबल ट्रस्ट च्या वतीने कोव्हीड आणि इतर कारणांमुळे ज्या मुला /मुलीने आपले पालकत्व गमावले आहे अशा मुला /मुलीसाठी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 22रोजी उपविभागिय कार्यालय गंगाखेड येथील भोलारामजी कांकरिया बहु उद्देशिय चेरिटबल ट्रस्ट च्या वतीने आज नोटबुक व शैक्षणिक साहित्याचे साहित्य प्रदान करण्यात आले तसेच 500 गरजु विद्यार्थी यांना दत्तक घेन्याचा संकल्प केला.

यावेळी उपविभागिय अधिकारी सुधीर पाटिल सर,तहसिलदार गोविंद येरमे सर,सीईओ वसुंधरा फड़ मैडम,बीडीओ अंकुश चव्हान सर,गटशिक्षण अधिकारी सगट सर, कांकरिया ट्रस्ट च्या सचिव सौ.मंजुताई दर्डा व ज्येष्ठ उद्योजक ज्ञानेश्वरजी महाजन ,पूजा दर्डा,अमर करंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED