स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने मालेगाव येथेल अंध अपंग शाळेत अन्नदान

    47

    ✒️विजय केदारे(नाशिक प्रतिनिधी)

    नाशिक(दि.18ऑगस्ट:-अनेक दिवसांपासुन निस्वार्थ समाज सेवेचा व्रत्त घेतलेले, सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले, अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र (प्रेणित) स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शि. अंकुश भाऊ कुमावत, शुभम भाऊ कुमावत, आदित्य पवार यांच्या मार्गदर्शना खाली मालेगाव येथिल अंध अपंग मराठी शाळा मालेगाव कँम्प मालेगाव येथे स्वातंञ्यदिना निमित्त अन्नदान करण्यात आले.स्वराज्यक्रांती सेवा संघ मालेगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र जगताप यांनी व त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम हाती घेतला.

    त्यावेळी मालेगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, खजिनदार कैलास वाघ, सोशल मिडिया प्रसिध्दी प्रमुख रोशन अाहिरे, संघटक गोकुळ हरणामे यांच्या माध्यमातुन अन्नदान करण्यात आले, तसेच नथू बाबा जगताप यांचे अनमोल सहकार्य लाभले.अन्नदान मोहिम साठी राहुल हरणामे, रघुनाथ मोरे, राजु बागुल गणेश गाढे ई. कार्यकर्ते उपस्थित होते.